महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५, २०, १८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५,०९, ८४८ विद्याथी परीक्षेला उपस्थित होते. यातील १३, ८७,१२५ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीचा निकाल ९३. ३७ टक्के लागला आहे. तर यंदाही मुलींनी मारली बाजी मारली आहे.
बारावीची परीक्षा ही तब्बल ९ विभागांमध्ये झाली होती. मागील वर्षी सुद्धा कमी अधिक प्रमाणात याचपद्धतीने विभागांची उत्तीर्णतेची टक्केवारी होती. ९७.५१ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर ९१.९५ टक्क्यांसह मुंबई विभाग सर्वात तळाशी आहे.
विभागीय मंडळनिहाय टक्केवारी
- कोकण – ९७.५१
- नाशिक – ९४.७१
- पुणे – ९४.४४
- कोल्हापूर – ९४.२४
- छत्रपती संभाजीनगर – ९४.०८
- लातूर – ९३.३६
- अमरावती – ९३.००
- नागपूर – ९२.१२
- मुंबई – ९१.९५
तर यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी ९१.६० टक्के आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील एका विद्यार्थिनीला बारावीच्या परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत.
शाखानिहाय निकाल
कला – ८५.८८ टक्के
वाणिज्य – ९२.१८
विज्ञान – ९७. ८२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ८७.७५ टक्के
आयटीआय – ८७.६९ टक्के