मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांची ८ जून रोजी बीडमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आलेली आहे. तब्बल ९०० एक्करांवर होणाऱ्या या सभेची राज्यभर चर्चा होती.
मनोज जरांगे यांची ८ जून रोजी नारायणगडावर सभा होणार होती. बीडमध्ये सध्या दुष्काळाचं संकट आहे. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं असून सभेसाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मनोज जरांगे यांची ८ जून रोजी नारायणगडावर सभा होणार होती. या सभेला तब्बल ६ कोटी मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ही सभा रद्द करण्यात आलेली आहे.
बीडच्या ऐतिहासिक सभेची राज्यभर चर्चा होती. परंतु यंदा बीडवर भीषण दुष्काळाचं सावट आहे. पिण्यासाठी पाणी नाहीये, सभेसाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. आता ही सभा जूननंतर होणार आहे. या सभेसाठी राज्यातूनच नाही तर परप्रांतातून देखील लोक येणार होते. आता पुढची सभा कधी होणार, याबाबत बैठक होणार आहे. जूननंतर सभा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.