माजगाव येथील तरुणा खून

माजगाव , ता. राधानगरी : अनिकेत भीमराव कांबळे वय वर्षे 25 या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केल्याची मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून बुधवारी सकाळी शेताकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना शेतात मृतदेह दिसला. घटनेच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या दिसून आल्या तर हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी व्यक्त केले आहे.

संजय पाटील यांच्या  शेतात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे शेजारी दारूच्या बाटल्या ग्लास असून समूहाने मध्यप्राशन करत बसले असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पोवार, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, रवींद्र कळमकर यांनी कर्मचाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या ठिकाणी मारेकर्‍यांनी कोणताही पुरावा ठेवला नसल्याने पोलिसांना या खुनाचा उलघडा करणे आव्हानच होते. मयत अनिकेत हा सेंट्रींग कामगार होता. तर गावात त्याचे एका महिलेसी अनैतिक संबंध असल्याचे बोलले जात होते. यातूनच ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राधानगरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच पथके तयार करून गावातील चार तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खुणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी हा खून अनैतिक संबंधातूनच झाल्याची चर्चा गावामध्ये होत होती यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे हे करीत आहेत.

🤙 9921334545