बारामती, सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर ,माढा, लातूर, उस्मानाबाद , रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 11 लोकसभा मतदारसंघात मंगळवारी उत्साहात मतदान पार पडले. हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 54.98 टक्के मतदान झाले. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरात सर्वाधिक मतदान झाले असून बारामतीमध्ये कमी मतदान झाल्याचे दिसून येते .
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील अटीतटीच्या लढाईने मतदानाच्या दिवशी भावनिक रूप घेतले. सुळे यांनी अजित पवारांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक वर्षांत प्रथमच बारामतीत मतदानाचा हक्क बजावला. मात्र संध्याकाळपर्यंत कमी मतदान झाल्याने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात मतदानाचा उत्साह सर्वाधिक होता. मतदान करण्याची वेळ संपली, तरीही काही केंद्रांवर रांगा होत्या.
कोल्हापुर आणि हातकणंगले येथे 70 टक्के मतदान तर उस्मानाबाद येथे 63 टक्के, लातूर मध्ये 64.41 टक्के, सातारा 63. 07 टक्के, रत्नागिरी -सिंधुदुर्ग येथे 64 टक्के, सांगली 60 टक्के, रायगड 58.01 टक्के, माढा 62.11 टक्के, सोलापूर 57. 64 टक्के तर बारामती मध्ये सर्वात कमी म्हणजेच 54. 58 टक्के मतदान झाले.