कोल्हापूर-बारामतीत चुरशीची लढत

कोल्हापुरात शाहू महाराज आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर, हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि शेतेकरी राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सांगलीत महायुतीचे संजय काका पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील  यांच्यात लढत होत आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात सामना होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यांत महाराष्ट्रातील कोल्हापूर, लातूर, बारामती, माढा, हातकणंगले, रायगड, धाराशिव (उस्मानाबाद), रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली आणि सातारा या ११ मतदारसंघात आज मतदान होत आहे. मागील काही दिवसांपासून बारामती, कोल्हापूर, सांगली हे मतदारसंघ जास्त चर्चेत राहिले असल्यामुळे राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे असणार आहे. या ११ लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
🤙 9921334545