
मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला घात केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी आपली बडबड बंद करावी, अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.
ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. प्रसाद लाड म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा नौटंकी सुरु झाली आहे. ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका करु लागले आहेत. ते वैफल्यग्रस्त झालेत. त्यामुळे ते फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवत आहेत. यापूर्वीही मनोज जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची होती.
आतादेखील ते शरद पवारांची स्क्रिप्ट वाचत आहेत. शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज सरकारसोबत आहे. मनोज जरांगे अशीच बडबड करत राहिले, तर समाज त्यांना नक्कीच जागा दाखवेल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.