कागल : शाहू ग्रुप व शिवजयंती लोकोत्सव समितीच्यावतीने युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली.
येथील बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुर्णाकृती पुतळ्यास शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व युवराज आर्यवीर घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच त्यांनी उत्सवमुर्तीस विधीवत जलाभिषेकही घातला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना मानाचा मुजरा करण्यासाठी तमाम कागलकरांनी मोठी गर्दी केली होती.
नगरपालिकेसमोर छत्रपती शिवाजी महाराज व बसस्थानकावरील कागलअधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या पुतळ्यासही श्री.घाटगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी रिक्षा स्टॉप जवळ येथील “कलादालन” या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुप मार्फत रेखाटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित रांगोळी व चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन घाटगे यांनी केले.
तसेच सकल मराठा समाज आयोजित खर्डेकर चौक येथील शिवरायांच्या पुतळ्यासही अभिवादन केले.राजमाता जिजाऊ महिला समितीच्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा तसेच शिवगीते गायिली. यावेळी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिवानीराजे घाटगे वहिनीसाहेब,सौ, विजया निंबाळकर ,सुधा कदम , शितल घाटगे, कारखाना संचालिका सुजाता तोरस्कर, रेखा पाटील ,सारिका चौगुले ,अनिता संकपाळ,ज्योती पाटील,रेवती बरकाळेविजयश्री निंबाळकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी जयसिंगराव घाटगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनीनी अत्यंत सुरेल आवाजात पाळणा गायन केले.यावेळी उपस्थित असलेल्या तमाम शिवप्रेमींनी वाद्यांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा विविध शिवमय घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवजयंती लोकोत्सव समितीचे अध्यक्ष धैर्यशील इंगळे,रमेश माळी,बाबगोंडा पाटील, राजेंद्र जाधव,विवेक कुलकर्णी, शाहूचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने, सतीश पाटील, सुनील मगदूम,सचिन मगदूम, शिवाजीराव पाटील, संजय नरके, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर,संचालक प्रकाश पाटील, आप्पासाहेब हुच्चे,आप्पासाहेब जाधव,उमेश सावंत,मारुती मदारे,हिदायत नायकवडी, असिफ मुल्ला,रंगराव तोरस्कर,अजितसिंह घाटगे, यांच्यासह शाहू ग्रुप मधील विविध संस्थांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.छायाचित्र- कागल येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करताना व उत्सव मूर्तीस अभिषेक झाल्यानंतर अभिवादन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे व युवराज आर्यवीर घाटगे*शाहू कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी*कागल, येथील श्री.छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी केली. कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बाॅबी माने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले.यावेळी कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.