कोण होता अभिषेक घोसाळकर ?

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरील झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे.

धक्कादायक म्हणजे त्यांच्यावर गोळीबार केलेल्या मॉरिस भाईने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. मॉरिस भाईने अभिषेक यांना एका कार्यक्रमाला बोलावलं होतं. तो कार्यक्रम सुरू होण्याची आधी सदर कार्यक्रमाविषयी फेसबुक लाईव्हद्वारे अभिषेक माहिती देत असताना मॉरिस याने त्यांच्यावर गोळीबार केला. मारण्याच्या उद्देशानेच अभिषेक यांना मॉरिसने कार्यक्रमाला बोलावलं होतं.

अभिषेक घोसाळकर कोण होता ?

माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा अभिषेक घोसाळकर मुलगा होता.

अभिषेक घोसाळकरने समाजकार्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली.

अभिषेक घोसाळकर दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवकघोसाळकर दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर ७चा नगरसेवक.

सध्या हा वॉर्ड शितल म्हात्रे यांच्याकडे आहे.सध्या घोसाळकरची पत्नी वॉर्ड नंबर १ ची नगरसेविका होती.