मुंबई: मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर मॉरीस नोऱ्हाना याने स्वतावर गोळी झाडून घेतली.
गुरुवारी (ता.८) अभिषेक एका बैठकीसाठी दहिसर येथील एमएचबी, आयसी कॉलनीतील मॉरीस याच्या कार्यालयात आले होते. दोघामध्ये चर्चा झाल्यानंतर अचानक मॉरीसभाई याने रिवॉल्वर काढले आणि एकुण पाच गोळ्या झाडल्या.त्यातील तीन गोळ्या अभिषेक यांना लागल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेकला कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या शिवसैनिकांनी करुणा रुग्णालयात दाखल करण्यात केले.तर हल्लेखोर मॉरीसला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले.अभिषेक यांना उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने काही वेळानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले.