कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : मच्छिंद्र कांबळे लिखित ‘शाहीनबाग ‘ या कादंबरीवर आधारित व अनुप जत्राटकर दिग्दर्शित ‘ वणवा ‘ या लघुपटाचा प्रीमिअर शो एम .के फाउंडेशन च्या वतीने कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग असोसिएशन हॉलमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे व प्रा. निवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
उद्घाटनाचा कार्यक्रम राष्ट्रगीताने सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर वणवा या लघुपटाचा टीजर आणि लघुपटाचे निर्माते मच्छिंद्र कांबळे यांचा जीवनपट दाखवण्यात आला.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले,मच्छिंद्र कांबळे यांच्या शाहीनबाग या कादंबरीच्या नायकाची स्थिती ही आपल्या चळवळीतील प्रमुख कार्यकत्यांसारखी असल्याचे सांगितले. चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्याला आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही त्यामुळेच देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी वणवा या लघुपटातील कलाकार व तंत्रज्ञांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा हाबळे यांनी केले.यावेळी या कार्यक्रमाला सुशीलकुमार कोल्हटकर, रामचंद्र कांबळे, सुरेश दबडे, आनंद भोजने, एम के फाउंडेशनच्या उपाध्यक्षा राजश्री कांबळे, सचिव सुरेश कांबळे, सदस्य सुरेश पाडळीकर, विनोद कांबळे आदी उपस्थित होते.