22 जानेवारी ला राजाराम बंधाऱ्याजवळ होणार दीपोत्सव : माजी आ.अमल महाडिक

कोल्हापूर: 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर उत्साहाचे वातावरण आहे. कोल्हापुरातही हा सोहळा साजरा करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांनीही अभिनव संकल्पना राबवली आहे.

        दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळच्या नदीकाठावर चित्र व शिल्पकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. याशिवाय अनेक नामवंत कलाकारही आपली कला सादर करणार आहेत. रामचरित्र आणि रामायणातील प्रसंग या विषयांवर आधारित ही स्पर्धा असेल. 

        तसेच दुपारी 3 ते 5 या वेळेत कोल्हापूर जिल्हा ब्राह्मण पुरोहित महासंघाच्या वतीने घाटावर हवनही संपन्न होणार आहे. 5 ते 6 या वेळेत मयूर कुलकर्णी आणि सुगम परिवाराच्या वतीने सामूहिक राम रक्षा पठण झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत पंचगंगेची महाआरती करण्यात येणार आहे. 

      सायंकाळी सात वाजता दीपोत्सवाला सुरुवात होणार असून यानंतर चित्र व शिल्पकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा समारंभ होईल. 

       तसेच 23 जानेवारीला सामाजिक भान राखत राजाराम बंधारा आणि परिसराच्या स्वच्छता मोहिमेचेही आयोजन करण्यात करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
🤙 9921334545