उद्याच्या रेल्वे रोको आंदोलनासाठी आज(ता.१८)रात्री ७ वाजता तुपकर गाडी बदलून पोलिसांना गुंगारा देऊन मलकापूर मुक्कामी जात होते..मात्र बुलढाणा पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत अखेर मोताळा नजीक त्यांना अटक केली.
रविकांत तुपकर काल रात्रीपासून नॉट रिचेबल व भूमिगत होते.. त्यांच्या घराभोवती अटकेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यांना शोधण्यासाठी अनेक पोलीस पथके रवाना झाली होती.. मला अटक करून सरकार शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय… मला अटक झाली तरी रेल्वे रोको आंदोलन होणारच.. मी घाबरणारा नाहीये.. शेतकऱ्यांसाठी जीव गेला तरी लढतच राहणार.असा ईशारा तुपकरांनी दिला आहे..