नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला… म्हणाले 

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. गेल्या दिड वर्षापासून हा सत्तासंघर्ष सुरु आहे. आज सभागृहात दोन्ही गटाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाचे आणि दोन्ही गटाच्या वकिलांचे आभार मानले.यावेळी नार्वेकरांनी ठाकरे गटाचा दावा फेटाळला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मत हे पक्षाचे मत असू शकत नाही. त्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी सोबत चर्चा करूनच निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे नार्वेकर म्हणाले. 

नार्वेकर म्हणाले, खरी शिवसेना कुणाची आणि व्हीप कुणाचा हा महत्वाचा मुद्दा माझ्यासमोर होता. घटना, नेतृत्व आणि विधिमंडळ बहुमत, हे तीन घटक पक्ष ठरवताना महत्वाचे आहेत. खरी शिवसेना कुणाची हा मुद्दा माझ्यासमोर होता. राजकीय पक्ष मी प्रथमदर्शनी ठरवताना शिवसेनेच्या घटनेचा देखील विचार झाला. निवडणूक आयोगाचा निकाल आणि पक्षाची घटना लक्षात घेता. निवडणूक आयोगाच्या नोंदीमध्ये शिंदे गट ही खरी शिवसेना आहे.

दोन्ही पक्षांनी (शिवसेनेचे दोन गट) निवडणूक आयोगाला सादर केलेल्या घटनेवर एकमत नाही. नेतृत्व रचनेबाबत दोन्ही पक्षांची मते भिन्न आहेत. एकमेव पैलू म्हणजे विधिमंडळ पक्षात बहुमत. वादाच्या आधी अस्तित्वात असलेल्या नेतृत्व रचनेचा विचार करून संबंधित घटना मला ठरवावी लागेल.”

निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलेल्या पक्षाच्या घटनेच्या संदर्भात दोन्ही गटात मतभेद आहे. खरी शिवसेना कुणाची हे सांगण्यासाठी घटनेचा आधार घेतला आहे आहे. निवडणूक आयोगाच निकाल, पक्षाची घटना याचा आधार निकाल देतान केला आहे. 2018 मध्ये घटनेच्या दुरूस्तीची दोन्ही पक्षकारांना पूर्ण कल्पना होती. त्यावेळी केलेली घटनादुरूस्ती ही सर्वांच्या संमतीने झाली आहे. पण याबाबत निवडणूक आयोगाकडे रेकॉर्ड नसल्यामुळे ही घटना ग्राह्य धरणार नाही, तर जुनी घटना 1999 सालची ग्राह्य धरणार आहे.”, असं अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं आहे.