सहकारातील आदर्श पुरस्कार आ. पी. एन. पाटील यांना जाहीर…

कोल्हापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणारा सहकारातील राज्यस्तरीय आदर्श नेतृत्व पुरस्कार आमदार पी. एन. पाटील साहेब यांना जाहीर झाला आहे. आज हा पुरस्कार कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या हस्ते संगमनेर येथे प्रदान करण्यात आला.

साहेब गेली चाळीस वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असून, त्यांनी सलग वीस वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून, तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व केंद्रीय निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सलग 35 वर्षे संचालक व त्यापैकी सलग पाच वर्षे अध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी केली आहे. या काळात शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजात सवलत देण्याचा निर्णय देशात सर्वप्रथम घेतला होता.

शाहूनगर, परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यावर साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 30 वर्षे सत्ता आहे. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून पाच वर्षे काम करताना त्यांनी कारखाना हिताची धोरणे राबवली. याचबरोबर राजीवजी सहकारी सूतगिरणी, श्रीपतराव दादा सहकारी बँक व निवृत्ती तालुका संघ या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन थोरात सेवाभावी संस्थेकडून प्रदान करण्यात आला.

https://fb.watch/pqnSm7cR03/?mibextid=Nif5oz