कागल(प्रतिनिधी) : धरणग्रस्तांनी केलेल्या त्यागामुळे हरितक्रांती झाली. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणे हा माझा राजधर्मच आहे असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथे कसबा सांगाव ता कागल येथील धरणग्रस्तांच्या वाकी व वाडदे वसाहतीतील नागरिकांचा बरीच वर्षे प्रलंबित असलेला प्रॉपर्टी कार्डाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल धरणग्रस्तांच्या वतीने घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कारनंतर ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सह शासन पातळीवर धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी सातत्याने माझा पाठपुरावा सुरू होता.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांची धरणग्रस्तांसमवेत संयुक्त बैठकही घेतली होती. या बैठकीत ठरल्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रतिनिधिक स्वरूपात वाकी व वाडदे वसाहतीत प्रत्यक्ष जाऊन या समस्यांबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकले होते व समस्यांची पाहणीही केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.त्यास आता यश मिळत असून हा प्रॉपर्टी कार्डचा बरीच वर्षे रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागणार असल्यामुळे याचे मला मोठे समाधान आहे.
सरपंच विरश्री जाधव म्हणाल्या, समरजितसिंह घाटगे आमदार किंवा खासदार नाहीत.मात्र जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने अहोरात्र झटत आहेत. कोणतेही पद नसताना ते जर एवढे काम करत आहेत तर आमदारकी सारखे पद जर त्यांना दिले तर ते यापेक्षा मोठ्या प्रमाणात जनतेचे प्रश्न मार्गी लावतील.
यावेळी पांडुरंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी,विक्रमसिंह जाधव,
एडवोकेट बाबासाहेब मगदूम,
समीर पाटील, आप्पासहेब पाटील,वसंत पाटील,मधुकर पाटील,संदीप कांबळे,पांडुरंग पाटील,सर्जेराव चव्हाण,धोंडीराम सावंत,शामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज पर्यंत आम्हाला सगळ्यांनी झुलवत ठेवले. समरजितसिंह घाटगे यांनी मात्र स्वतः जातीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला. त्याबद्दल आभार व्यक्त करताना ‘माझ्या राजानं कड लावली’ अशा अस्सल ग्रामीण शैलीत सावित्री चव्हाण या वयोवृद्ध स्त्रीने समरजितसिंह घाटगे यांचे कौतुक केले.