आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक

नागपूर: आरक्षाणाच्या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे राज्यात दौरे घेत आहेत. त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आपले जे ठरले होते, त्याप्रमाणे काय झाले?हे 17 तारखेपर्यंत सांगा, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 

दरम्यान, राज्य मागासवर्गीय आयोगाची 19 डिसेंबरला नागपुरात बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा समाजाबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. सर्वेसाठी सदस्यांच्या सूचनांनुसार केलेले निकष अंतिम करण्यात येणार आहेत. नियोजनानुसार आयोगाची बैठक २२ डिसेंबरला पुण्यात होणार होती. मात्र आयोगाच्या अध्यक्षांनी ३ दिवसआधीच बैठक बोलावली आहे. 

मनोज जरांगे यांचा इशारा-

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आतापर्यंत काय झाले, हे स्पष्ट करा. अन्यथा 17 तारखेला ते फोटो आणि व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमांना देणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले. 

राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आतापर्यंत काय झाले, हे स्पष्ट करा. अन्यथा 17 तारखेला ते फोटो आणि व्हिडिओ आम्ही प्रसार माध्यमांना देणार आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

🤙 9921334545