संजीवनी देशपांडे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी आणि माजी वि्द्यार्थी महासंघाच्यावतीने गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये सौ. संजीवनी समीर देशपांडे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रायव्हेट हायस्कूलचे माजी विद्यार्थी, आयसीटीचे माजी कुलगुरू पदमश्री डाॅ. जी. डी. यादव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे पदाधिकारी सन्मानीय भूपेंद्र शहा, अरूण डोंगरे, उदय सांगवडेकर, सौ. एस. आर. डिंगणकर, डाॅ. ज. ल. नागावकर, मिलिंद करमळकर, जी. एस. जांभळीकर, प्रकाश मेहता, केशव तिरोडकर, प्रशांत कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजरा येथील शारदाबाई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, आजरा कनिष्ठ महाविद्यालय, अॅड. पी. आर. मुंडरगी इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर, प्रायव्हेट हायस्कूल आणि नुतन मराठी विद्यालय हायस्कूल कोल्हापूर या सर्व ठिकाणी काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमवटला आहे.

यावेळी अरूण डोंगरे, भूपेंद्र शहा, डाॅ. ज. ल. नागावकर, सौ. एस. आर. डिंगणकर उपस्थित होत्या.