आनंदी शिधा वाटपाचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते

कोल्हापूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाकडून दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या आनंदी शिधा चा वाटप शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते व खासदार धनंजय महाडिक व खासदार धैर्यशील माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालय येथील ताराराणी सभागृहामध्ये करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनीता नेरलेकर वितरण अधिकारी प्रज्ञा कांबळे जिल्हाध्यक्ष डॉ रवींद्र मोरे, शहराध्यक्ष राजेश मंडलिक, खजानिस अशोक सोलापुरे, उपाध्यक्ष गजानन हवालदार आदी उपस्थित होते.

🤙 8080365706