रोजच्या आहारात तुम्ही काय खाता किती प्रमाणात खाता हे आरोग्यासाठी फार महत्वाचे असते. खासकरून तुम्ही सकाळच्यावेळी जे काही खाता त्यावर अवलंबून असते की तुम्ही दिवसभर एनर्जेटीक राहाल की नाही.

म्हणूनच दिवासाची सुरूवात ही फार महत्वाची असते. तुम्ही असे काही पदार्थ खायला हवेत. ज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला पुरेपूर पोषण मिळेल.
कोणते पदार्थ खाल्ल्याने दिवसभर शरीराची उर्जा टिकून राहते, पाहूया. म्हणूनच दिवासाची सुरूवात ही फार महत्वाची असते. तुम्ही असे काही पदार्थ खायला हवेत. ज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीराला पुरेपूर पोषण मिळेल. कोणते पदार्थ खाल्ल्याने दिवसभर शरीराची उर्जा टिकून राहते…. पाहुया
बदाम
मेंदूच्या चांगल्या कार्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. यात व्हिटामीन्स मॅग्ननीज, व्हिटामीन ई, प्रोटीन्स, ओमेगा-३ आणि फॅटि एसिड्टस यांसारखी पोषक तत्व असतात. रात्रीच्या वेळेस पाण्यात भिजवून सकाळी खाणे ही बदाम खाण्याची सर्वात चांगली पद्धत आहे.
ओट्स
ओट्स हा हाय प्रोटीन्स आणि हाय फायबर्सयुक्त नाश्ता आहे. सकाळच्या नाश्त्याला ओट्स खाल्ल्याने यातील हायड्रोक्लोरिक एसिड पोटातील जळजळ रोखते आणि फायबर्स कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात.
सफरचंद
सफरचंदात व्हिटामीन्स, फायबर्स, फायटोकेमिकल्स आणि अन्य पोषक तत्व असतात जे रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यानं शरीराला पुरेपूर फायदे मिळतात. फळांचे सेवन केल्यामुळे शारीरिक उर्जा वाढवण्याबरोबरच शरीर डिटॉक्ससुद्धा होते.
कलिंगड
पूर्ण दिवस शरीराचे डायड्रेशन चांगले राहण्यासाठी तुम्ही सकाळच्यावेळी कलिंगडाचे सेवन करू शकता. कलिंगडात जवळपास ९० टक्के पाणी आणि इलेक्ट्रोलाईट्सस असतात जे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. रिकाम्यापोटी कलिंगड खाल्ल्याने पोटाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
मध
सकाळी गरम पाण्याबरोबर मध घेतल्यास पचनक्रिया चांगली राहते. एक ग्लास कोमट पाण्यात १ मोठा चमचा मध आणि अर्धा लिंबू मिसळून प्या. मधातील फ्लेवोनाईड्स, खनिजे, व्हिटामीन्स आणि एंजाईम्स पोट साफ करण्यास आणि वजन कमी करण्यासही मदत करतात.
