दोनवडे : शिंदेवाडी (ता. करवीर) येथे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजता घडली ओंकार विलास पाटील (वय २४)असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन शिंदेवाडी गावातून ऊसतोड मजुर आणण्यासाठी निघाला होता. त्याच्या मागून ओंकार हा दुचाकी होऊन चालला होता. ओव्हरटेक करत असताना समोरून ही गाडी आल्यामुळे त्याचा तोल गेला व ट्रॅक्टर ट्रॉली ला धडकून तो चाकाखाली सापडला. त्याच्या डोक्यावरून गेल्यामुळे तो जागीच मयत झाला. घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला आहे.