कागल( प्रतिनिधी) साखर कारखान्याने चालू सन २०२३ -२४ या गळीत हंगामासाठी प्रतिटनाला एकरक्कमी विनाकपात ३१०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कायद्यानुसार उपपदार्थांच्या विक्रीतून रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार जो दर निघेल, तो ऊस दरातील फरक हंगाम समाप्तीनंतर देण्यासाठी कारखाना प्रशासन बांधील आहे, अशी माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
सन २०२३ -२४ या गळीत हंगामात कारखान्याकडे गाळपासाठी येणाऱ्या उसाला प्रतिटनाला ३१०० रुपयांप्रमाणे विनाकपात एकरकमी एफआरपी अदा केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कायद्यानुसार ठरविलेल्या रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युल्यानुसार उपपदार्थांच्या विक्रीतून जो ऊस दरातील फरक निघेल, तो हंगाम समाप्तीनंतर शेतकऱ्यांना देण्यासाठी कारखाना प्रशासन बांधील आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्वच्या सर्व ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही घाटगे यांनी केले आहे.