सद्गूरू बाळूमामांच्या जन्मकाळ सोहळ्यानिमित्य विकास फौंडेशन च्या वतीने रक्तदान शिबिर

आदमापूर (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील आदमापूर क्षेत्री सद्गुरू बाळूमामा विकास फौंडेशन वतीने उद्या गुरूवार २६ आक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती विकास फौंडेशन चे अध्यक्ष व आदमापूर गावचे सरपंच विजयराव गुरव यांनी दिली.

प्रत्येक रक्तदात्याला यावेळी घोंगडी प्रदान करणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली. सद्दुरू बाळूमामा विकास फौॉडेशन व अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.बहुसंख्य रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाघी व्हावे असे आवाहन या प्रसंगी संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिराचे हे २५ वे वर्ष असून गेल्या २५ वर्षात ५ ते ६ हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे तर १५०० रुग्णांना तातडीच्या वेळी या रक्तदानाचा फायदा झाला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विजयराव गुरव यांनी सांगितले. या जन्मकाळ कार्यक्रमाचे औचित़्य साधून आमदार रोहित पवार यांनी आदमापूर ग्रामपंचायतीस पाणी टँकर प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.राजेंद्रदादा पवार यांच्या शुभहस्ते हा पाणी टँकर प्रदान कार्यक्रम होणार आहे.

यावेळी श्री क्षेत्र आदमापूर देवस्थानचे प्रशासक शिवराज नाईकवडे, आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव गुरव व जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष मेंगाणे आदि उपस्थीत राहाणार आहेत.

🤙 8080365706