आमदार अमित देशमुख व धीरज देशमुख यांचा ताफा अडवला…

उस्मानाबाद: शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांचा ताफा मराठा समाजाकडून अडवण्यात आला.

लातूरमधील रेनापूर तालुक्यातील निवाडा येथे हा ताफा अडवण्यात आला. दरम्यान मराठा समाजातील यो दोन्ही आमदारांनी विधानसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला नसल्यानं मराठा समाजाकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान निवाडा येथील रेणा साखर कारखाना येथे देशमुख कुटुंबियांनी हजेरी लावली. त्यावेळी मराठा आंदोलक त्याठिकाणी एकवटले होते.

दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तर आमदार धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच पेटला आहे. त्यातच या दोन्ही आमदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून केला जातोय. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.

आम्ही तुमच्या भावनांशी एकरुप – अमित देशमुख

दरम्यान यावेळी आमदार अमित देशमुख यांनी जमलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘सुरुवातीला देखील अनेकांनी हा मुद्दा उचलून धरला होता. पण त्यामध्ये अनेक मतमतांतरं होती. पण आम्ही तुमच्या भावनांशी एकरुप आहोत. म्हणूनच काँग्रेस पक्ष या आंदोनाच्या पाठिशी आहे.

‘कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांचाही ताफा अडवलामराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लोकप्रतिनिधींना गाव बंदी करण्याचा निर्णय राज्यातील अनेक गावांनी घेतला आहे. असाच निर्णय लातूर जिल्ह्यातील वाढवणा या गावाने घेतला आहे. वाढवणा हे आहे गाव उदगीर विधानसभा मतदारसंघ मधील आहे. या मतदारसंघाचे आमदार हे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे हे आहेत. मंत्री संजय बनसोडे हे आज गावातून एका कार्यक्रमासाठी चिमाची वाडीकडे निघाले असताना त्यांचा ताफा अडवण्यात आला.

मराठा आरक्षण आंदोलकांनी हा ताफा अडवला. यावेळी मराठा आरक्षणासाठी साठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी आपल्या भावना तीव्र शब्दात कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्यासमोर मांडल्या आहेत.मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर गावामध्ये लोकप्रतिनिधींना येण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याच पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये लोकप्रतिनिधींना येण्यास मज्जाव केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. :