मुंबई: आगामी निवडणुकांसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी देखील मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.,अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील कामाला लागली आहे.
गलिच्छ राजकीय चिखलातून बाहेर पडायचे असेल तर आता एकमेव रेल्वे इंजिन हा पर्याय आहे, असं मनसेने म्हटलं आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकांवर प्रतिक्रिया देत असताना मनसेने भाजपवर खोचक शब्द टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. “मराठी माणसाचा बुलंद आवाज “राजसाहेब ठाकरे”.
गलिच्छराजकीय चिखलातून बाहेर पडायचे असेल तर आता एकमेव रेल्वे इंजिन हा पर्याय आहे…मराठी माणसाचा बुलंद आवज दाबण्यासाठी तेंव्हा राष्ट्रवादी, काँग्रेस ने प्रयत्न केले….२०१४ नंतर उद्धव ठाकरे आणि भाजपने ते तसेच पुढे चालू ठेवले.
पुढे जाऊन…भाजप -शिवसेना ह्यांची राजकीय गणित बिघडली आणि मग एकमेकांना शह देण्यासाठी परस्पर विरोधी विचारधारा असलेल्या पक्षांच्या गळ्यात गळे घालण्यात आले.
सुरवात भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन केली,नंतर उद्धव ठाकरे तर बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्य भर लढले त्यांच्याच गोटात जाऊन बसले.
मग भाजपने गलिच्छ राजकारणाचा दुसरा डाव खेळला….शिंदेंचे PA जोशी चौकशीच्या फेऱ्यात अडकले तसे एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांनी उडी घेऊन भाजपच्या गोटात दाखल झाले.
त्यावरही भाजपचे काही समाधान झाले नाही…मग ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले त्या अजित पवारांना मंत्रिमंडळात मानाचे स्थान देऊन गलिच्छ राजकारणाची मर्यादाच ओलांडली.
मराठी मतदारा,आता मात्र तुला ह्यातून बोध घेऊन नवनिर्माणाच्या इंजिनाच्या डब्यात बसून महाराष्ट्राला ह्यातून बाहेर काढायला तुलाच हातभार लावायला लागणार आहे.
येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपल्या हक्काच्या स्थानिक पक्षाला (मनसेला )भरभरून मतदान करून महाराष्ट्राची रेषा उंच करायची आहे,” असं मनसेने ट्विट करत म्हटलं आहे.