कोल्हापूर : खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस असल्याने दस्तुरखुद्द पोस्टमन बनून पोस्टाच्या कामकाजाची माहिती तर घेतलीच पण खाकी गणवेश परिधान करून चक्क पोस्ट टपाल सुद्धा वितरित केले.
जेंव्हा टपाल द्यायला आलेली तरुण व्यक्ती पोस्टमन नसून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत हे कळालं तेंव्हा ज्यांच्या घरी पत्र,मनी ऑर्डर आणि एटीएम कार्ड वितरीत केली त्यांना सुखद धक्का बसला, आणि त्यांनी कृष्णराज महाडिक यांचं कौतुक ही केलं…
