भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा गणेश मंडळाची आरती करत असतानाच लागली आग…

पुणे : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पुणे दौऱ्यावर असताना एक मोठी दुर्घटना टळली. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळात बाप्पाची आरती करण्यासाठी जे.पी.नड्डा दाखल झाले.

मात्र त्याचवेळी गणेश मंडळाने साकारलेल्या महाकाल मंदिराच्या देखाव्याला आग लागल्याची घटना घडली. देखाव्याच्या कळसाला आग लागल्याने जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर जावं लागले. दरम्यान पाऊस सुरु असल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे पुण्यातील एका मंडळात गणपतीची आरती करत असताना अचानक आग लागली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी लगेच त्यांना बाहेर काढलं. त्या संबंधित एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये आग लागल्यानंतर पोलिसांनी जेपी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर काढल्याचं दिसून येतंय.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या.

साने गुरूजी तरूण मंडळामध्ये ते आरती करत असताना मंडळाच्या कळसाला आग लागली. त्यामुळे नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले.पाऊस सुरू झाला आणि आग विझलीमंडळाच्या कळसाला आग लागल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी जेपी नड्डा यांना तात्काळ बाहेर काढलं. त्यानंतर लगेच पाऊस सुरू झाल्याने आग लगेच विझली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

🤙 9921334545