चांगुलपणाच्या चळवळीची मंथन बैठक पन्हाळ्यात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ‘चांगुलपणाची चळवळ’तील निवडक समाजसेवींची मंथन बैठक आज, सोमवारपासून पूजा ग्रीनलँड, आंबवडे सुरू आहे. (ता. पन्हाळा) येथे आयोजित केल्याची माहिती राज देशमुख (पुणे), पारस ओसवाल, अनिल नानिवडेकर यांनी दिली.

संविधानातील समता, न्याय व स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारित संपूर्ण समाज परिवर्तन, हा या चळवळीचा मुख्य उद्देश आहे. उत्तम संस्था, व्यक्ती आणि विचार याद्वारे समाज परिवर्तन होऊ शकते, या विचाराने देशभर २०० स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. चळवळीने २०१९च्या महापुरात कोल्हापूर जिल्ह्यात संस्मरणीय काम तर केलेच, तसेच दोन गावे दत्तक घेऊन तेथे पुनर्वसन, प्रशिक्षण व प्रबोधनाद्वारे अनेक उपक्रम राबविले.

देशभरातील समाजसेवी, विचारवंत, लेखक, उद्योजक या चळवळीत सहभागी असून, येथे वंचित शंभर घटकांसह महिला, वयोवृद्ध, दिव्यांग, तृतीयपंथी यांच्या समस्यांवर कार्य आजच्या बैठकीला डॉ. ज्ञानेश्वर मुळे मार्गदर्शन करणार असून, दिल्ली, पंजाब, राजस्थान, मुंबई, पुणे येथील १०० कार्यकर्तेही विचार मांडणार आहेत.

बैठकीत आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेऊन, पुढील तीन वर्षांच्या कामाचे नियोजन करण्यात येणार आहे. सोमवारी 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता उद्घाटन तर उद्या मंगळवारी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात बैठक आयोजित केल्याचे राज देशमुख यांनी सांगितले.