श्रीपतराव दादा सहकारी बँकेला सव्वा तीन कोटी रुपयांचा नफा- आम.पी. एन. पाटील

कौलव ( प्रतिनिधी)
श्रीपतराव दादा सहकारी बँकेने सभासदां सह ग्राहकांचे हित जोपासले असून प्रगतीपथावर घोडदौड करणाऱ्या या बँकेला ३ कोटी २२ लाख रुपये नफा झाला असून दहा टक्के लाभांश देणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे संस्थापक आमदार पी. एन . पाटील सडोलीकर यांनी केले . आर्थिक अडचणी तील सुतगिरण्यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहनपर धोरण राबवून त्यांना अनुदान द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली .
फुलेवाडी येथील अमृत मंगल कार्यालयात श्रीपतराव दादा सहकारी बँक, राजीवजी सहकारी सुत गिरणी व निवृत्ती तालुका खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी आमदार पाटील मार्गदर्शन करत होते . श्रीपतराव दादा बँकेने शेतकर्यांपासून सर्वच घटकांसाठी विविध योजना राबवून आर्थिक उन्नती साठी व्यापक प्रयत्न केल्याचे सांगितले . राज्य सरकार सहकार चालवण्या ऐवजी सहकार मोडण्याचे काम करत असल्याने संस्था चालवताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले .
वाढते वीजदर व कच्च्या मालाची टंचाई यामुळे सुतगिरण्या आर्थिक अडचणीतून वाटचाल करत आहेत . त्यांना प्रतियुनिट पाच रुपये दराने वीजदरात सवलत द्यावी .त्याचबरोबर प्रती चाती पाच हजार रुपये कर्ज मंजूर करून त्याचे व्याज शासनाने भरावे अशी मागणी आमदार पाटील यांनी केली .
श्रीपतराव दादा बँकेची सभा अध्यक्ष राजेश पी . पाटील सडोलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली . इतिवृत्तांताचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी एस बी दिंडे यांनी केले . यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील यांनी बँकेने शेतकरी सुशिक्षित बेकार शेतकरी व विविध घटकांसाठी विविध योजना राबवल्याचे सांगितले .
राजीवजी सहकारी सुत गिरणीची वार्षिक सभा अध्यक्ष राहुल पी . पाटील सडोलीकर यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . इतिवृत्तांत व अहवाल वाचन सरव्यवस्थापक एस एस तानुगडे यांनी केले . यावेळी बोलताना अध्यक्ष पाटील यांनी शासनाने अडचणीतील सुतगिरण्यांसाठी विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी केली .
निवृत्ती तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा अध्यक्ष आप्पासाहेब माने यांच्या अध्यक्षते खाली पार पडली . अहवाल वाचन व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी केले . संघाला अहवाल सालात साडेनऊ लाख रुपये नफा झाला आहे . यावेळी निवृत्ती तालुका भाजीपाला संघाची वार्षिक सभा संपन्न झाली .
यावेळी सुतगिरणी कर्जमुक्त केल्या बदल अध्यक्ष राहुल पाटील व आ . पाटील यांचा सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भारत पाटील भुयेकर यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी सूतगिरणीचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील बँकेचे उपाध्यक्ष गणपतराव पाटील, संघाचे उपाध्यक्ष बी एच पाटील सर्व संस्थांचे संचालक तसेच गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, माजी संचालक पी. डी . धुंदरे ,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर, माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, भोगावती चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, शिवाजीराव कवठेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा . डॉ . सुनील खराडे यांनी केले .

🤙 9921334545