कोल्हापूर प्रतिनिधी- शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा ए एस ट्रेडर्सचा म्होरक्या लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार (रा. पलूस, जि. सांगली) याला गुन्हे अन्वेषण शाखेच्या विभागानं ताब्यात घेतलंय. मंगळवारी पहाटे सुभेदार याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
लोहितसिंग सुभेदार आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून कोल्हापुरात ए एस ट्रेडर्स नावानं कंपनी सुरू केली. गुंतवणुकीवर आर्थिक परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत राज्यभरातून कोट्यवधी रुपये त्यांनी गोळा केले. गुंतवणुकीवर परदेशवारी, आलिशान कार तसेच भेटवस्तु देत त्यांनी लोकांना आकर्षित केलं होतं. सुरुवातीला या कंपनीकडून लोकांना मासिक परतावा मिळत होता.