तीन शेतकऱ्यांचा अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार ७९२ एकरचा पीक विमा

बिड : जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्याची भारतीय कृषी विमा कंपनीने तपासणी सुरू केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी अकृषिक जमिनीवर तब्बल २ हजार ७९२ एकरचा पीक विमा काढून क्षेत्र संरक्षित केले आहे.

जिल्ह्यातील काही भागात काही ठिकाणी अतिरिक्त पीक विमा भरण्याची बाब भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर रिमोट सेन्सिंगचा आधार घेत ग्राऊंड ट्रुथिंग करण्याचे आदेश दिले होते. १५ दिवसांच्या कालावधीत विमा कंपनीने केलेल्या तपासणीत अतिरिक्त पीक विमा भरून त्याचे पैसे लाटण्याच्या उद्देशाने विमा भरल्याचे दिसून येत आहे.

🤙 8080365706