वडिलांच्या निधनानंतर तीन दिवसातचं गौतमींन धरला पुन्हा ठेका…

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डान्सनं वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलच्या वडिलांचं 3 दिवसांपूर्वीच निधन झालं. वडीलांच्या निधनाच्या दु:खात असलेल्या गौतमीनं नुकतीच बोरिवली येथे हजेरी लावली होती.

मुंबई आणि ठाण्यात दहीहंडीचा उत्साह सुरू आहे. गौतमी पाटीलला तारामती चॅरिटेबल फाऊंडेशन, मागाठाणे यांच्याकडून आमंत्रण देण्यात आलं होतं. तीन दिवसांआधीच वडील वारलेल्या गौतमीनं आमंत्रणाचा आणि कलेचा मान ठेवून ठाण्याच्या हंडीला हजेरी लावली आणि 5 मिनिट थिरकून गोविंदा पथकांचं मार्केट जाम केलं. यावेळी गौतमीला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमा झाली होती.गौतमी येणार म्हटल्यावर गर्दी, राडा होण्याची दाट शक्यता असते. मात्र पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आला होता.

मागठाणे येथे दहीहंडीसाठी आलेल्या गौतमीला पाहण्यासाठी संपूर्ण मैदान भरलं होतं. 5 मिनिटांच्या डान्समध्ये गौतमीनं तिच्या कातील अदांनी गोविंदा पथकांना फिदा करून सोडलं. यावेळी गौतमी लाल रंगाची नऊवारी साडी नेसून आली होती.मोकळे केस, कंबरेवर लखलखणारा पट्टा आणि गौतमीच्या कडक डान्सनं तिने सर्वांचं लक्ष वेधलं. ‘सरकार तुम्ही मार्केट जाम’ या तिच्या प्रसिद्ध गाण्यावर गौतमी थिकरली.हेही गौतमी पाटीलनं पहिल्यांदा कधी पाहिलं होतं वडिलांचे तोंड? पित्याबद्दल बोलताना भावुक झाली होती लेकतीन दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. यानंतर लेक गौतमी पाटील हिनं वडिलांची जबाबदारी घेत त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केलं होतं. पण उपचारांती त्यांचा मृत्यू झाला. गौतमी स्वत: वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेली होती.

🤙 8080365706