
पुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी जाण्याच्या बेतात असेल तर थांबा कारण, खंडोबाचे मंदिर पुढील दीड महिना बंद असणार आहे. त्याचे कारणही मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे.
जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाच्या आणि घोड्याचा गाभारा 28 ऑगस्टपासन कामासाठी दीड महिना बंद राहणार असल्याचे मंदिर प्रशासनाने जाहीर केले आहे. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम सुरू असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असेही मंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले.
त्रिकाळ पुजा नेहमीप्रमाणे सुरूच राहणार आहेपुढील दीड महिना जरी खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागणार असली तरी खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. मात्र, इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे.
