जेसीबीवरून फुलांची उधळण करत अजित पवार यांचं स्वागत

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आले आहेत. बारामतीकरांकडून अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे.जेसीबीवरून फुलांची उधळण करत अजित पवारांचं बारामतीमध्ये स्वागत करण्यात आलं.

यानंतर अजित पवारांचा शारदा प्रांगणात नागरी सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर अजित पवारांनी भाषण केलं, तसंच आपण सत्तेमध्ये सहभागी का झालो याचं कारणही सांगितलं.2004 ला मुख्यमंत्रीपद मिळाल नाही, उध्दव ठाकरेंसोबत पण अडीच-अडीच वर्ष करता आला असतं, पण मला काही गोष्टी बोलता येत नाहीत, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्रीपद न मिळाल्याबाबत नाराजी व्यक्त केली.अजित पवारांचं भाषण’मी बारामतीकरांच्यासमोर काय बोलायचं असा प्रश्न पडला, मला 91 पासून तुम्ही निवडून दिलं आहे, मी जो काही आहे तो बारामतीकरांमुळेच आहे. एवढं प्रेम केलंय की कधीच ऋण फेडू शकत नाही.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली, अधिवेशन झालं. नक्की कोणत्या कारणांमुळे अजित पवारांनी ही भूमिका घेतली हे कळलं पाहिजे,’ असं अजित पवार म्हणाले.’मी शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन चाललो आहे, तेव्हा तो कृतीतून दिसला पाहिजे, असं वागतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही घटकाला असुरक्षित वाटणार नाही, जोपर्यंत मी मंत्रिमंडळात आहे, हा शब्द देतो,’ असं आश्वासन अजित पवारांनी दिलं

🤙 8080365706