
अमरावती : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविषयी भाजपकडून महत्वाचे विधान करण्यात आले आहे. खासदार नवनीत राणा यांनी 2024 सालची निवडणूक ही भाजपच्या कमळ या चिन्हावर लढावी, त्यांनी तसं नाही केलं तर मग आम्ही वेगळा विचार करू असं सूचक वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले आहे. आता बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘जर नवनीत राणा यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक कमळावर नाही लढवली तर तो त्यांचा निर्णय आहे. मग आम्ही वेगळा विचार करू. आमची सगळ्यांची भावना आहे की नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी. असे ही ते म्हणाले आहेत.
