
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापूरमध्ये सभा होत आहे. पवारांचे खंदे समर्थक हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांसोबत जात सत्तापक्षाला समर्थन दिलं. त्यामुळे मुश्रीफ भावुक झालेले बघायला मिळाले.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 40 वर्षानंतर प्रथमच कोल्हापुरात शरद पवार येऊन देखील आमची भेट होणार नाही. परिस्थितीप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे. का निर्णय घ्यावा लागला याचे विवेचनही आम्ही केलेले आहे. आज पवार साहेब येत आहेत, मात्र मी त्यांच्यासोबत नाही.. असे सांगत ते भावुक झाले.