
कोल्हापूर : नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमावर आधारित ‘सुभेदार’हा सिनेमा २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा देशभरातील विविध शहरासह परदेशातही झळकणार आहे.

सहा देशात सिनेमा प्रदर्शित होत आहे.अशी माहिती अभिनेते अजय पूरकर यांनी दिली. लेखक दिग्पाल लांजेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांत प्रचंड उत्सुकता लागून राहिलीय.
या सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकारांची टीम, २३ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात होती. शहरातील विविध कॉलेजिअसना भेटी देत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीदरम्यानाचे अनुभव, सिनेमाची बलस्थाने यासंबंधी उपस्थितांशी संवाद साधला. सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका अजय पूरकर यांनी केली आहे.