कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) संघाशी सलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज संकल्पसिद्धी मंगल कार्यालक पुईखडी, कोल्हापूर येथे माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील (आबाजी) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थित पार पडली.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले कि गोकुळ दूध संघ हि संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची मातृसंस्था असून, दूध संघ हा कष्टकरी, श्रमजीवी शेतकऱ्यांचा आहे. त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. या संस्थेचा पाया स्व.आनंदराव पाटील-चुयेकर यांनी घातला असून त्यांनी पाहिलेल्या स्वप्ने पुर्ण करण्याची दूध उत्पादन वाढविण्याची जबादारी हि आपल्या सर्वांवरती आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात या संचालक मंडळाने मी व राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आघाडीच्या सर्व नेते मंडळीच्या नेतृत्वाखाली काटकसरीचे, बचतीचे धोरण अवलंबले आहे. संघाच्या वार्षिक प्रक्रिया खर्च कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्याना जादा मोबदला देण्यास आम्ही सर्वजन कठीबद्ध आहोत असे मनोगत व्यक्त केले व पुढे बोलताना म्हणाले म्हैस दूध वाढीसाठी सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करणे गरजेचे असून गोकुळ म्हणून जी मदत करता येईल ती मदत केली जाईल तसेच के,डी.सी.सी बँक मार्फत आण्णासाहेब पाटील महामंडळ कडून म्हैस खरेदीसाठी पूर्वी १ लाख रुपये होती ती रक्कम वाढवून देण्यात येणार असल्याचे सांगितले संघाचे २० लाख लिटर्स दूध संकलन पूर्ण करण्यासाठी या योजनेचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना संघाचे माजी चेअरमन जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील म्हणाले कि तालुक्यातील दूध उत्पादक, दूध संस्था यांच्या अडी–अडचणी तसचे दूध उत्पादकांना संघाच्या विविध योजनांचा माहिती होण्यासाठी संघाकडून संपर्क सभेचे आयोजन केले असून. आलेल्या सर्व दूध संस्था प्रतिनिधीचे मी संघाच्या वतीने स्वागत करतो व पुढे बोलताना पाटील म्हणाले गोकुळची ओळख हि म्हैस दुधाची असून करवीर तालुक्यातून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी संघाच्या विविध योजना तसेच स्व.आनंदराव पाटील – चुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम योजना प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. या संपर्क सभेस दूध संस्था प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वासराव पाटील, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, शरद तुरंबेकर, श्कापडिया, डॉ. मोंगले, भरत मोळे यांनी समर्पक उत्तरे दिली.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी केले.तसेच संचालक बाळासो खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तर आभार संचालक बाबासाहेब चौगले यांनी मानले.यावेळी संघाच्या दूध वाढ कृती कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विस्तार सुपरवाझर यांचा सत्कार करण्यात आले.गोकुळ मार्फत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी तर्फे उतरवण्यात आलेल्या किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत पावलेल्या सभासदांच्या वारसांना व मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले.यावेळी संकलन, पशुसंवर्धन, वैरण विकास, पशुखाद्य, वित्त, मिल्कोटेस्टर, संगणक, गुणनियंञण व दुध बिल या विभागावर सविस्तर चर्चा होवून अडचणी समजावून घेवून त्या प्रश्नांचे निरसण करण्यात आले तसेच विविध सूचनाची नोंद घेण्यात आली.
याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील –चुयेकर, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, चेतन नरके,रणजितसिंह पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी तसेच करवीर तालुक्यातील दूध संस्थाचे चेअरमन, संचालक, प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.