अपात्र आमदारांच्या कारवाईला सुरुवात: राहुल नार्वेकर

मुंबई : अपात्र आमदारांच्या कार्यवाही बाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना, आता लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली जाईल असे सांगितले आहे.

गेल्या काही वेळांपूर्वीच राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी, “आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यासाठी संपूर्ण कायदेशी प्रक्रियेचं पालन केलं जाईल. तसेच सर्व नियमांचं आणि सांवैधानिक तरतुदींचं पालन केलं जाईल. त्यानुसारच याप्रकरणी कारवाई होईल. ही कारवाई लवकरात लवकर पार पडेल. यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही.” अशी माहिती दिली आहे.त्याचबरोबर, आमदारांना बोलावून सुनावणी घेतली आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना, “अद्याप नाही, सुनावणी संदर्भात काही ड्राफ्ट इश्यूजसह इतर तयारी सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष सुनावणी होईल” असे सांगितले आहे. सध्या, आमदार अपात्रतेच्या याचिकांवर विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीस विलंब केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने लावला आहे.

🤙 8080365706