गोवा येथील फोर बाय फोर ऑफ रोड चॅलेंजचे अश्विन शिंदे- कृष्णकांत जाधव विजेते

कोल्हापूर: गोवा सीओळी येथे झालेल्या फोर बाय फोर ऑफ चॅलेंज स्पर्धेमध्ये येथील अश्विन शिंदे व कृष्णकांत जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

सीओळी गोवा येथे टीम फोर बाय फोर ऑडिक्ट यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पेट्रोल मॉडिफाय प्रकारात फोर बाय फोर कोल्हापूर स्पोर्टस क्लबचे खेळाडू अश्विन व कृष्णकांत यांनी विजेतेपद मिळविले. त्यांना चषक, ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

🤙 9921334545