एनआयएची कोल्हापुरात मोठी कारवाई

कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यात आता राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने कोल्हापुरात मोठी कारवाई केली.

एनआयएने कोल्हापुरात तीन ठिकाणी छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचाही दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे.राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकाने कोल्हापूर आणि नाशिक या ठिकाणी छापेमारीची कारवाई केली आहे. कोल्हापुरातच तीन ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. कोल्हापूर, इचलकरंजी आणि हुपरी या ठिकाणी एनआयएने छापेमारी केली. याप्रकरणी एनआयएने तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हे तिघे संशयित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचा एनआयएचा संशय आहे. या छापेमारीच्या कारवाईबाबत पोलिसांना माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.

🤙 9921334545