मंगळवारची रात्र चिखलीकरांची धास्ती वाढवणारी

कोल्हापूर : सोमवार पासून पावसाचा जोर कमी राहिला मात्र मंगळवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला शिवाय सायंकाळी मात्र राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुटणार अशी बातमी आल्याने मंगळवारची रात्र चिखलीकरांची धास्ती वाढवणारी ठरली.

पुराच्या पाण्याचा अंदाज घेऊन कोणत्याही क्षणी बाहेर पडायचे अशा तयारीत आहोत मात्र पाणी रात्रीचे वाढले तर काय असे जास्तीचे कारण होते. त्यामुळे मंगळवारी दिवसभरात ग्रामस्थात राधानगरी धरणाच्या पाणी पातळीची चर्चा सुरू होतीसोमवारी सकाळपासून मंगळवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी राहिल्यामुळे पुराचे वाढलेले पाणी उतरण्याची शक्यता होती मात्र मंगळवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा पाणी वाढण्याचा धोका निर्माण झाला होता.सोमवारी थांबलेले स्थलांतरण मंगळवारी दुपारपासून पुन्हा वाढले. अनेक ग्रामस्थांनी आपली वाहने सुरक्षित स्थळी हलवली. काहींनी कुटुंब आणि जनावरांसह आज स्थलांतर करण्या स प्राधान्य दिले.दरम्यान प्रशासनाने ग्रामस्थांनी वेळीच स्थलांतर करावे असा आग्रह मंगळवारी धरला. अनेक ग्रामस्थांनी जोखीम न घेता स्थलांतराचा मार्ग अवलंबला. दरम्यान चिखली आंबेवाडी वरणगे या मार्गावर अद्याप पुराचे पाणी नसल्यामुळे या गावाशी संपर्क चालू आहे.पावसाचा जोर राहिला तर बुधवारी पुराचे पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकार पूरग्रस्थानी सांगितलेदरम्यान बुधवारी सकाळपासून स्थलांतराचा वेग वाढेल असे सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले

🤙 8080365706