शासकीय पत्रव्यवहारात शिवराज्यभिषेक बोधचिन्ह वापरणे अनिवार्य

बालिंगा: मोहन कांबळे / “३५० वा शिवराज्याभिषेक” निमित्त शासकीय कार्यक्रम व शासकीय पत्रव्यवहारावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र आणि त्यांच्या शौर्याची महती दर्शवणारे बोधचिन्ह वापरण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आज निर्णय घेतला आहे. या बाबतीत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी आज दिनांक 24 जुलै रोजी एक शासन निर्णय निर्गमित केला आहे.

शिवकालीन मंगल चिन्हे व महाराजांचा पराक्रम , शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर पुन्हा मराठी मनामध्ये व्हावा जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्याबद्दलची माहिती पोचवी हा या मागचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीत तसेच शासकीय पत्रकारांमध्ये बोध चिन्हाचा वापर करावा असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

🤙 8080365706