दोनवडे येथे वाहतूक रोखल्याने; तणाव

दोनवडे प्रतिनिधी:कोल्हापूर गगनबावडा मार्गावर संध्याकाळी 6 वाजता दोनवडे फाटा व बालिंगा येथे पोलिसांनी वाहतूक रोखल्याने वाहन धारकात गोंधळ उडाला आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

रस्त्यावर पाणी येण्याआधीच पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणातून अचानक केलेल्या या कारवाईमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

दोनवडे फाटा ते साबळेवाडी व दोनवडे येथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर पाणी येण्यास 2 ते 3 फूट अंतर कमी असतानाच पोलिसांनी ही कारवाई केल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली आहे.

🤙 8080365706