अँड्रॉइड मशीन वाहकांच्या हाती…

मुबंई : कॅशलेस एसटी प्रवासासाठी महामंडळ प्रशासनाने नवे अँड्रॉइड मशीन वाहकांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगीक तत्वावर मुंबई, ठाणे विभागात या मशिन देण्यात आल्या असून, चाचणी योग्य राहिल्यास राज्यभरात मशीन आगार पातळीवर देण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाचा आहे.

एसटी महामंडळाने ईबिस्कॅश या नव्या कंपनीशी करार केला असून, महिनाभरात एसटीतल्या ३४००० वाहकांना नवे अँड्रॉइड तिकीट मशीन देण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे विभागांमध्ये सर्व वाहकांना या मशीन देण्यात आल्या असून, त्यामधील त्रुटी समजावून घेण्याचं प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे या नव्या मशीनचे जुजबी प्रशिक्षण देखील वाहकांना दिले जाणार आहे. राज्यातील इतर आगारात देखील अंशतः या तिकीट इशू मशीन चे वाटप झाले असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले आहे.

🤙 8080365706