डोळ्यांची पोषणमुल्ये वाढवणारे पदार्थ

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी शरीराला जीवनसत्व, अ, क व इ, झिंक, व सॅलीनियम ही अँटीऑक्‍सिडंट्‌स, ओमेगा इत्यादी फॅटी आम्ले यांची आवश्‍यकता असते. ही पोषणमुल्ये पुढील अन्नपदार्थातून मिळतात.

जीवनसत्व ए किंवा याचा एक प्रकार म्हणजे बीटा कॅरोटीन, हे जीवनसत्व आपल्या डोळ्यांचे कार्य उत्तम व नियमितपणे करण्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. खूप पूर्वीपासून आपण ऐकत आलो आहोत की गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप आवश्‍यक आहे. केवळ गाजरच नाही तर केशरी, लाल, नारंगी रंगाची फळे व भाज्या यांमध्ये हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येऊ शकतो. तसेच रेटीना व कॉर्निया सारख्या डोळ्यातील अतिमहत्वाच्या भागांनाही कमकुवतपणा येण्याची शक्‍यता असते.

जीवनसत्व क हे आंबट फळे जसे आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादीमध्ये तसेच स्ट्रॉबेरी, शृजबेरी, रासबेरी मध्ये पण असते. सर्वसाधारणपणे संसर्गजन्य रोग होऊ नये म्हणून ही जीवनसत्वे सैनिकासारखे आपले रक्षण करत असतात. डोळ्यांच्या संसर्गापासून रक्षण व मोतीबिंदूची शक्‍यता बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम क जीवनसत्व करते

ई जीवनसत्व हे अँटीऑक्‍सिडंट्‌सचे काम करते. जीवनसत्व अ चे ऑक्‍सिडेशन होण्यापासून वाचवते. आपण जसे घर घासून पुसून साफ करतो, किटाणूंचा कचऱ्याचा सफाया करतो, तसेच हे अँटीऑक्‍सिडंट्‌स फ्री रॅडीकल चा सफाया करतात. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया, हवेचे प्रदूषण, सिगारेट ओढणे इत्यादींमुळे फ्री रॅडीकल्स तयार होतात. बदाम, अंड, वनस्पतीजन्य तेल इत्यादी मध्ये ई जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते.

🤙 8080365706