हा मुस्लिम देश उभारणार आता भव्य हिंदू मंदिर

नवी दिल्ली : भारताव्यतिरिक्त अन्य काही देशांमध्ये हिंदू देव-देवतांची मंदिरं आहेत. आता संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएईमध्ये हिंदू मंदिराची उभारणी होत आहे.

दिराच्या उभारणीचं काम वेगात सुरू आहे.हे मंदिर खूप खास असणार आहे.2015मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूएईचा दौरा केला होता. त्या वेळी तिथे मंदिर उभारणीसाठी तिथल्या सरकारने जमीन भेट दिली होती. विशेष म्हणजे यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद अल नाहयान यांनी ही जमीन भेट दिली आहे.मंदिराच्या परिसराचा विचार केला, तर हे मंदिर 27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत आहे. मंदिर उभारताना भारतीय परंपरा आणि वास्तुकलेला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यूएईमध्ये अबू मरीखा इथे हे मंदिर उभारण्यात येत आहे.मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी 2024 रोजी हे मंदिर सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुलं होईल.14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीदरम्यान जे कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहेत, त्या कार्यक्रमांना नोंदणी केलेल्या मर्यादित व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.यूएईतील अबू मरीखा इथे उभारण्यात येणारं हे भव्य मंदिर या देशातलं पहिलं हिंदू मंदिर ठरेल. ते भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.

🤙 8080365706