
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय भूकंप घडत आहेत. दरम्यान २ जून रोजी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा उधाण आले असतानाच आमदार अमोल मिटकरी यांच्या एका ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे. आज अजित पवार यांचा वाढदिवस असताना त्यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असं ट्विट केलं.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार अमोल मिटकरी यांनी हे खास ट्विट केलं आहे. ‘’मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’’ अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलंय. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
