पाय दुखीवर प्रथमोपचार

काही वेळा अचानक किंवा हळूहळू पाय दुखणे सुरू होते. काही वेळा तर पाय दुखत असल्याची जाणीव तळव्यापासून किंवा टाचेपासून सुरू होते आणि नंतर कमी होते.अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्याआधी प्रथमोपचार म्हणून कोणते उपचार करणे गरजेचे आहे, जाणून घेऊया.

पायाला येणारी भोवरी, पायाच्या स्नायूंना होणारी दुखापत किंवा धावताना चालताना पाय मुरगळणे अशा दुखापतींकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. वेळीच त्यावर उपचार करा. बर्फाने किंवा गरम पाण्याने शेक देणे आणि फिजिओथेरपी या गोष्टी पायांसाठी आवश्यक आहेत.

चालताना पायामध्ये अचानक तीव्र वेदना जाणवते. अशावेळी थांबा. लगेच पायाची हालचाल करू नका.पायाला मुंग्या येणे किंवा पाय सुन्न होणे हीदेखील एक समस्या आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीस हलणेदेखील अवघड होते. यामागे बऱ्याचदा शरीराचे वजन जास्त असल्याने पायाला हा त्रास होतो. हा त्रास होण्यामागे पायाला होणारा अपुरा रक्तपुरवठाही कारणीभूत असतो. जर रक्तवाहिन्यांमधून स्नायूंना रक्तपुरवठा कमी झाला, तर चालण्याने वेदना वाढते. त्यामुळे सावकाश उठा. हळूहळू हालचाल करून पाय मोकळे करा.जेव्हा पायाला बॅक्टेरियांमुळे इंफेक्शन होतो तेव्हा जळजळ होणे, तो भाग सूजणे, वेदना होणे. ताप येणे, किंवा पायांच्या काही भागांमध्ये लालसरपणा दिसून येतो. असं दिसून आल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

🤙 8080365706