
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर, विद्या प्रबोधिनी व ज्योती कॉम्प्युटर सर्व्हिसेस कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जुलै रोजी विद्या प्रबोधिनी येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी युवक युवतींसाठी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, उद्योजक राजेश तांबवे, MAARG स्टार्ट अपचे सदस्य प्रा. हर्षवर्धन पंडित, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.
