
कोल्हापूर : आदर्श करिअर अकॅडमी संस्थापक अध्यक्ष डॉ दिलीप देसावळे वय 65 वर्ष(बहादुरवाडी तालुका, वाळवा जिल्हा सांगली) यांचे आज शनिवारी निधन झाले.
देशाच्या सैनिकी सेवेत त्यांच्या अकॅडमी मधून हजारो तरुणांना देशसेवेची संधी प्राप्त करून दिली आहे. आदर्श करिअर अकॅडमीला देशांमध्ये नावलौकिक मिळवून देण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने बहादुरवाडीसह संपूर्ण वाळवा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
आदर्श करिअर अकॅडमी म्हणजेच देसावळे मामा असं समीकरण होतं प्रत्येक जण मामा या नावाने त्यांना हाक मारायचे हसतमुख व्यक्तिमत्त्व आणि शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख संस्थेत रूढ झाली होती. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यातील विविध संस्था संघटनांकडून समाज भूषण सारखे अनेक मोठ पुरस्कार मिळाले. त्याचबरोबर त्यांना डॉक्टर ही पदवी देखील मिळाली.
देसावळे यांच्या पाश्चात त्यांच्या पत्नी, मुली, जावई, मुलगा, नातवंड असा त्यांचा मोठा परिवार आहे. डॉ. दिलीप देसावळे यांच्या आत्म्यास शांती लाभो न्यूज मराठी 24 च्या परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
